गुरुवार, २८ जुलै, २०११

उपकार

(छायाचित्र सौजन्य: रचना कुलकर्णी)
.
.
त्या रचनाकाराने केवढे ते उपकार केले
तुला सावळा रंग आणि मला डोळे दिले
तुझ्या गालावर खळी मला खळीचे वेड
तुला मिश्किल शैली मला हृदय भोळे दिले

तुला घनदाट केस तुला गहिरे डोळे
मला भावनेत गच्च ओली दिली कविता
तुला आठवताच शब्द सुरेख अर्थ पांघरती
आजकाल मी कविता करतो येता जाता

तुला मिळाली जीवघेणी हसण्याची कला
गोड पापण्यांची भाषा आणि हळुच लाजणे
मला मिळाले ओढ, हुरहुर आणि वेडेपणा
तुझा विचार करत रात्र रात्र जागणे

तुषार जोशी, नागपूर
.
.

२ टिप्पण्या:

  1. फारच अप्रतिम,मस्त कविता , फार फार आभार तुम्ही मला तुमच्या कविता संग्रहात सामील केल्या बद्दल......

    उत्तर द्याहटवा