गौरी धुमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गौरी धुमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

 


(छायाचित्र सौजन्य: गौरी )

मोहरण्याला पुरली असती गालावरची खळी पण

तिचे स्वप्नघन टपोर डोळे रंगाने सावळी पण

.

वरवर बघता कठोर कणखर आतुन प्रेमाचा निर्झर

तिचा होऊनी जगता कळले तिच्यातले बाभळी पण

.

वेचून घ्यावा ती असण्याचा अनुभव बोटांनी अलगद

पुरेल का या माझ्या एका जन्माची ओंजळी पण?

.

हो म्हणताना भान असू दे जगण्याची शिखरे धूसर

असेल उत्कट वाट सुखाची दुःख प्रखर वादळी पण

.

परतुन येणे कठीण आहे  मोहाचे कवितेचे घर

एक वेंढळा ऐकत नाही आणि एक वेंधळी पण

.

तुष्की नागपुरी

नागपूर, ४ सप्टेंबर २०२५