रविवार, ६ मे, २००७

किती रंग

.
.
किती रंग राहून गेलेत
अजुनही घालायचे
किती छंद राहून गेलेत
अजुन जोपासायचे

किती पुस्तके किती कविता
वाचू कसे आणि कधी
भांडार जणू सागर विशाल
थेंबाइतका दिलाय अवधी

सगळे करणे शक्यच नाही
स्वीकारतो शांत होतो
जवळचा पहिला रंग घेतो
पुन्हा प्रवास सुरू करतो

तुषार जोशी, नागपूर

२ टिप्पण्या:

  1. फोटो आणि कविता... वेगवेगळ अस्तित्व आहे पण प्रत्येक कवितेत.. दोन्हीचा छान मेळ जमवलाय की अप्रतिम आहेत..

    प्रत्युत्तर द्याहटवा