शुक्रवार, १२ डिसेंबर, २००८

प्रतिबिंब

(छायाचित्र सौजन्य योषिता)

तू कविता ऐकतेस ना
तेव्हा तूच कविता होतेस
डोळे बंद करतेस ना
तेव्हा तर जीवच घेतेस

मी थोर कवीची कविता
बघताना हरवून जातो
माझी कविता मेणबत्ती
तू सूर्य होऊन जातेस

तुलाच लिहितो नंतर
मी शब्दा शब्दां मध्ये
शब्दांच्या तळ्यात मग तू
प्रतिबिंब होऊनी खुलतेस

तुषार जोशी, नागपूर

२ टिप्पण्या:

  1. http://marathi-e-sabha.blogspot.com/ या ब्लॉगवरील नवीनतम पोस्ट पहा. तुमचा सहभाग प्रार्थनीय आहे.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा