बुधवार, ९ मे, २०१२

प्रार्थना

(छायाचित्र सौजन्य: गौरी )
.
.
ती हसते आणिक
पसरवते आनंद चारी दिशांना
ती दरवळते अन्
गंधित करते कोमेजल्या मनांना

ती फूलून येते
पाहुन तिजला ताजे परिसर होती
बघता बघता पक्षी
मंजुळ मंजुळ गाणे गाती

ती खाण सुखाची
फुलवत जाते हास्यरसाच्या बागा
दुःखाला वा
वेदनेला उरतच नाही जागा

पण डोळ्यांच्या
कडांमधे का पाणी भरले आहे
ती काय सोसते
काय तिच्या नशिवात दडले आहे

लवपून व्रणांना
वाटत फिरते मखमाली दिलासे
वाटेस येऊदे
तिच्याही (देवा) सुखस्वप्नांस जरासे

तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
०९ मे २०१२, ००:३०


1 टिप्पणी:

  1. पण डोळ्यांच्या
    कडांमधे का पाणी भरले आहे
    ती काय सोसते
    काय तिच्या नशिवात दडले आहे..........


    मनात भरकटलेल्या काही विचारांना शब्दांची वाट सुद्धा दाखवता येते हे तुमच्या कविता वाचून समजतं अप्रतिम आहे याच्या प्रशंसेसाठी एकदम मस्त चं या पलीकडे काय लिहू कळत नाही कविता खूप खूप आवडली मनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो कवी असतो असं वाचलं होतं...
    पण दुसऱ्यांच्या मनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो महाकवी असतो याचा आज अनुभव आला..सर, एकदम सही आहे कविता...........

    उत्तर द्याहटवा