शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

रोमांचांचे गाणे

(छायाचित्र सौजन्य: यामिनी )
.
.
एक निराळी सौंदर्याची आभा
छोट्या छोट्या गोष्टींनाही येते
कुणी सावळी राजस हसते जेव्हा
जगण्याचीही तेव्हा कविता होते

जरा थांबतो वारा थबकुन जातो
गंधभारल्या श्वासांना लय येते
केस मोकळे सोडुन कोणी जेव्हा
बांधायाचे अगदिच विसरून जाते

नकोच पाहुस खोल एकटक वेडे
अनवट नाते मनभर विणल्या जाते
डोळ्यांमध्ये घेऊन सागर पाणी
बघणाऱ्याला अलगद हरवुन नेते

चित्र तुझे साठवतो हृदयामध्ये
रोमांचांचे क्षण क्षण गाणे होते
खुळा बावरा भास तुझा होताना
डोळे मिटुनी भिजून जाणे होते

तुष्की नागपुरी
नागपूर, १ फेब्रुवारी २०१८, २२:३०

६ टिप्पण्या:

  1. सौंदर्य जसे कालांतराने बदलत असते.तसेच कालांतराने विचार बदलत असतात.चांगले विचार आल्यास तबडतोब पकड करून चांगल्या विच्यारवताजवळच उधळावे.
    आपण असू या नसू पण आपले विचार अमरांचा राहणार.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच सुंदर मांडणी केली आहे 👌👌👌👌👌👌❣️❣️

    उत्तर द्याहटवा