शुक्रवार, १२ जून, २०२६

सख्या सजणा - १२

 

(छायाचित्र सौजन्य: प्रथमेश)

.

सुटाबुटात ऐटीत जेव्हा समोर तू आला

तुझा रूबाब बघून डोळापूर कौतुकाला

.

धारदार पैलू तुझे सूट दावतो जगाला

सुटाबुटाचे कोंदण तुझ्यासारख्या हिऱ्याला

.

साध्या पोषाखात छटा मुक्तछंद कवितेची

सुटाबुटात झळाळी वृत्तबद्ध कवितेची

.

काळे डोळे केस काळे सूटबूट सर्व काळे

काळा रंग आजकाल किती आवडतो गडे

.

अश्या रूपात बोलून जिंकशील कुणालाही

अशी स्टाईल अचूक असे वागणे निश्चयी

.

साध्या वेशात येताही जातो डोळ्यात भरून

पुरे जिंकण्याचा बेत सुटाबुटात येऊन

.

तुझे मोकळे वागणे आवडले होते मला

तुझे हासून बोलणे आवडले होते मला

.

आज शिस्तीत पाहीले तुझे करारी बोलणे

धन्य होऊन फिटले माझ्या डोळ्यांचे पारणे

-

तुझे असणे वाढवी गोडी माझ्या आयुष्याची

तुझ्या नजर मिठीत ऊब हिवाळी उन्हाची

.

तुष्की नागपुरी

नागपूर, १२ जून २०२६, २०:३०


मंगळवार, ९ जून, २०२६

मंत्र

 

(छायाचित्र सौजन्य: प्रथमेश)
.

मी तुझ्यावर करते
नेहमी प्रश्नांचा भडीमार
भेटता क्षणी लगेच
सुरू हे विचार ते विचार
तू बघतोस मला
करतोस आश्वस्त स्मीत
मग ओढतोस तुझ्या
गच्च बाहुपाशात
माझे प्रश्नच मला
नेहमी चकित करतात
तुझ्या कुशीत शिरताच
सगळे गुमान सरतात
.
तुला शब्दांची कधी
गरजच नसते अगदी
तुझ्या डोळ्यातच असते
सगळी भावनांची गर्दी 
तू असतोस नेहमी
आजुबाजूस माझ्या
आश्वासक डोळ्यांतून
मिळतो सदैव आधार तुझा
मग कधी तू अचानक
बोललास दोन शब्दात
ते शब्द उरत नसतात
मंत्र होत जातात
मंत्र होत जातात
.
तुष्की नागपुरी
नागपूर, मंगळवार, ९ जून २०२६