बुधवार, १७ जून, २००९

संधी


(छायाचित्र सौजन्य मंदार)
.
तो तत्वज्ञान बोलतो
कवितेतून त्याच्या
पण मला दीपवून जातो
प्रकाश चेहऱ्याचा

शब्द बघ शब्द बघ
आग्रह त्याचा नेहमी
पण डोळ्यांच्या रोख कसा
सोडवायचा आम्ही

कविता ऐकायला माझी
ना नसतेच कधी
डोळे भरून चेहऱ्याकडे
बघण्याची तिच संधी

कवितेतून मनावर
चालतंच त्याच राज्य
गोड हसून काबीज ठेवतो तो
हृदयाचेही साम्राज्य

तुषार जोशी, नागपूर
१७ जून २००९, १८:००

.




३ टिप्पण्या:

  1. पण डोळ्यांचा रोख
    कसा सोडवायचा आम्ही..... काढाल तितके अर्थ. :)

    उत्तर द्याहटवा
  2. छानच आहे कविता, पण डोळ्यांचा रोख सोडवायचा म्हणचे काय.

    उत्तर द्याहटवा