गुरुवार, २४ एप्रिल, २०१४

सुंदर

(छायाचित्र सौजन्य: सुनिता )
.
.
जितके मोहक आणि तुझे ते दिसणे सुंदर
त्याहुनही आहेस जशी ते असणे सुंदर.
.
कवितांनाही अद्वितीय येतोय सुंगंध
शब्दाशब्दातून तुझे ते ठसणे सुंदर
.
विचार देती तुझे मनाला दंश विलक्षण
तरी हवेसे किती अहा हे डसणे सुंदर
.
फसशिल सांभाळून म्हणाले लोक कितीदा
इतके झाले कधीच नव्हते फसणे सुंदर
.
'तुष्की' हसतो किती गोड म्हणतात मला ते
तुला आठवुन दिसते माझे हसणे सुंदर
.
 ~ तुष्की
वाशींग्टन, २४ एप्रिल २०१४, ०७:००

1 टिप्पणी:

  1. फार सुंदर अक्षरशिल्प साकरलेय,
    एखाद्या प्रतिमेला पाहुन अशी अक्षरलेणी सुचन त्या प्रतिमेला बहुमोल करुन जाते...
    Thanks TusharJi

    उत्तर द्याहटवा