बुधवार, १५ जुलै, २०१५

किल्ला

(छायाचित्र सौजन्य: मनाली )
.
.
किती जहरी तुझं गं हासणं
माझ्याकडं बघुन मगापासनं
आधिच सावळ्या रंगाची भूरळं
त्यात मोकळ्या केसांनी जाचणं

तुला पाहिल्या पासुन बये गं
दुनिया ऑऊटॉ फोकसं झाली
किती छटा मी टिपल्या तरीही
तुझ्या अदेची सर ना आली

रूप तुझे केवढे गनीमी
सांभाळता आले ना स्वतःला
गुंतलो रायगडाची शपथ
तुझा झाला हा हृदयाचा किल्ला

तुष्की नागपुरी
नागपूर, १५ जुलै २०१५, ०८:००

1 टिप्पणी:

  1. काय राजे... एवढं सुंदर हसतेय मनाली आणि तुम्ही जहरी हास्य म्हणताय... जिव्हारी हास्य म्हणायचंय का तुम्हाला ? छायाचित्र बेस कवितांची कन्सेप्ट जबरीच. खुपच छान. शुभेच्छा !

    उत्तर द्याहटवा