मंगळवार, १२ एप्रिल, २०११

पाहिले होते तुला मी

(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)
.
सावळ्या रंगास आली काय गोडी रंगताना
मी म्हणालो 'हाय जालिम मार डाला' पाहतांना

खोल झाला वार होता शल्य त्याचे काय सांगू
पाहिले होते तुला मी लाजुनिया हासताना

काय झाले काळजाचा एक ठोका सापडेना
घेतले तू नाव माझे काल जेव्हा बोलताना

मोहिनी केसांमधे काही तुझा गं दोष नाही
गुंततो जो तो सुगंधी केस ते तू माळताना

तू दिसावे तू हसावे तू असावे अतरंगी
मी बघावा रोज माझा जीव वेडा भाळताना

तुषार जोशी, नागपूर
१२ एप्रिल २०११

७ टिप्पण्या:

  1. तुषारजी नमस्कार,
    अतिशय सुंदर कविता लिहलीय.खुप आवडली.ध्न्यवाद आणि शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद राज आणि मनाली. तुम्हाला कविता आवडली याचा मला आनंद आहे.

    तुषार जोशी, नागपूर

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर कविता आहे
    अशाच सुंदर कविता आम्हा रसिकांना देत राहा
    धन्यवाद.................

    उत्तर द्याहटवा