शिवानी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवानी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ मार्च, २००९

कुठे पाहते ग पोरी

(छायाचित्र सौजन्य शिवानी)
.
.
.
कुठे पाहते ग पोरी
डोळे तिरके करून
मनातले कळेचना
तुझा चेहरा बघून
.
गालावर पसरले
किती हसणे रेखीव
आज बिचा~या कुणाचा
कुठे जाणार का जीव
.
डोळ्यांमध्ये साठलेले
आहे कौतुक कुणाचे?
आहे रहस्य कसले 
तुझी कली खुलण्याचे?
.
नको सांगू नको सांगू
ठेव गोष्ट लपलेली
तुझे डोळे कधी तरी
करतीलच चुगली
.
.
तुषार जोशी, नागपूर