शुक्रवार, २९ जुलै, २०११

वेंधळा साजण

(छायाचित्र सौजन्य: रिद्धिमा कोटेचा)
.
.
कधी कधी अशी भीती वाटते की आपण सौंदर्याला शब्दात बांधून आपल्याच शब्दांच्या मर्यादेत त्याला बांधू तर पहात नाही?  सौंदर्य सागरासमान आणि आपले शब्द फक्त थेंब रूप आहेत.  यावेळेस सौंदर्याला बांधून घालायची ईच्छाच होत नाहीये, तर एका खुळ्या वेंधळ्याची कल्पना शक्ती प्रक्षेपित करूनच हौस भागवतोय.

तुला पाहिले साडीत
आणि जागी ठार झालो
तुझ्यासाठी खुळा होतो
आता वेडा पार झालो

थोडे मराठी दागिने
तुला आवडतील का?
साध्या मराठी मुलाची
सोबतीण होशील का?

तुझ्या नाकावर नथ
कानी मोत्यांच्या कुड्या
गळ्यामध्ये ठुशी येता
होणे अप्सराही वेड्या

तुझ्या नाजुक गळ्यात
चपलाकंठी शोभेल
तुझी होऊनिया धन्य
मोहनमाळ ठरेल

वाकी पाटल्या मेखला
पायी पैंजणे जोडवी
किती मोहक हवीशी
माझी कल्पना असावी

साजेसा केसात खोपा
भाळी कुंकवाचा टिळा
ईतकेच मागतो हा
तुझा साजण वेंधळा

मराठी त्या दागिण्यांची
शोभा वाढवशिल का
एका मराठी मुलाची
सोबतीण होशील का?

तुषार जोशी, नागपूर
.
.

८ टिप्पण्या:

  1. वाह तुषार सर वाह,
    बहुत सुन्दर कविता

    उत्तर द्याहटवा
  2. मनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो कवी असतो असं वाचलं होतं...
    पण दुसऱ्यांच्या मनातल्या भावना जो शब्दात उतरवतो.. तो महाकवी असतो याचा आज अनुभव आला... शतशः धन्यवाद..!!!

    उत्तर द्याहटवा
  3. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद विश्वेश, अजय, सागर, प्रज्वल

    उत्तर द्याहटवा