(छायाचित्र सौजन्य: स्तुती)
.
.
बरीच प्रसाधने घेता येतील
पण मला आवडे उत्कटता
चेहरा खुलून येतो सहज
जेव्हा प्रकटते उत्कटता
.
काजळ लाली पावडर सारे
शिनगार करतील की उसना
प्रितीयुक्त भावनांनी चेहरा
अनुपम फुलून येईल ना
.
नथ डूल माळ दागिने
नटवणार की हो रूपाला
पण तरीही तोडच नाही
मादक मोहक हसण्याला
.
तुषार जोशी, नागपूर
१२ जुलै २०१०, १०:४५
पण मला आवडे उत्कटता
चेहरा खुलून येतो सहज
जेव्हा प्रकटते उत्कटता
.
काजळ लाली पावडर सारे
शिनगार करतील की उसना
प्रितीयुक्त भावनांनी चेहरा
अनुपम फुलून येईल ना
.
नथ डूल माळ दागिने
नटवणार की हो रूपाला
पण तरीही तोडच नाही
मादक मोहक हसण्याला
.
तुषार जोशी, नागपूर
१२ जुलै २०१०, १०:४५
.
.