शुक्रवार, ११ जानेवारी, २००८

झुरळ पुराण


Cocroach, originally uploaded by Vijayaraj.

.

एकदा एका झुरळाला
असह्य झाले झुरळपण
त्याने फुलपाखरू होण्याचा
मनामधे केला पण

विविध रंगांनी आपले
पंख त्याने रंगवले
फुलांवर दिमाखात
तेही मिरवू लागले

फुलपाखरामध्ये फिरला
पाहिल्या विविध छटा
पण थोड्याच वेळात
झाला एकटा एकटा

त्याला समजणारे
तिथे कोणीच नव्हते
फुलपाखरांचे सगले
संदर्भ वेगले होते

ओशाळला बिचारा
परत फिरला माघारी
मित्रांनी केली होती
स्वागताची तैयारी

बगिचा रिटर्न झुरळ
म्हणून मित्रांचे स्वागत
ग्रहण करत बिलगला
सगळ्यांना धावत धावत

मनापासून म्हनाला
मित्रांनो मी चुकलो
आपल्याच वेडात ख-या
झुरळपणाला मुकलो

आता एक चांगले
झुरळ व्हायचे ठरवलेय
स्वतःच्या अस्तित्वाला
आता मी ओळखलय

तुषार जोशी, नागपूर

२ टिप्पण्या:

  1. तुषारजी,
    छान जमली आहे कविता. अगदी साध्या शब्दांतसुद्धा फार सुरेख आशय मांडलाय.
    शुभेच्छा.
    -प्रशांत

    उत्तर द्याहटवा
  2. तुशारजी, छान जमली आहे कविता.
    आतापर्यंत कावळ्याने पोपट व्हायचे ठरवले वाचले होते पण झुरळाने फुलपाखरू बनायचे ही कल्पना तुम्ही छान रंगवली.

    उत्तर द्याहटवा