(छायाचित्र सौजन्य: शाकल शुक्ल )
.
.
तिचे स्मितं हास्य तिचे बोलके डोळे
निरागस सौंदर्याचे मधाळ पोळे
तिचे बोलके डोळे
जिथे जाते लोकांना आपले करते
सर्व नात्यांसाठी आदर्श ठरते
धीट कमालीची जरी हृदय भोळे
तिचे बोलके डोळे
तिच्यासाठी जग तिचे खास लोकांचे
फुलविले हौसेने बगिचे स्वप्नांचे
उंच जाती तिच्या कल्पनांचे हिंदोळे
तिचे बोलके डोळे
तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
१० जुलै २०१२, ००:३०
निरागस सौंदर्याचे मधाळ पोळे
तिचे बोलके डोळे
जिथे जाते लोकांना आपले करते
सर्व नात्यांसाठी आदर्श ठरते
धीट कमालीची जरी हृदय भोळे
तिचे बोलके डोळे
तिच्यासाठी जग तिचे खास लोकांचे
फुलविले हौसेने बगिचे स्वप्नांचे
उंच जाती तिच्या कल्पनांचे हिंदोळे
तिचे बोलके डोळे
तुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)
१० जुलै २०१२, ००:३०
वाह तुषारजी !! केवळ छायाचित्रा वरून तुम्ही छान कवितेची रचना केलीत. मजा आली. अति उत्तम :-)
उत्तर द्याहटवा