गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५

नकोसा भाग

(छायाचित्र सौजन्य: लीन )
.
.
मी पूर्णच आहे.
आखिव रेखीव घडलेला.
काही नकोसा भाग
तासून बाजूला केला;
की दिसायला लागेन,
माझ्या दिव्य रूपात तुम्हाला
आणि मलाही.
हे नकोसे भाग
काढायला, मी सुरवात करतोय
स्वतःवरच घाव घालून.
नको असलेला...
एक एक भाग बाजूला काढतोय.
मला दुखेल..
वेदनेने विव्हळायला होईल..
मी ओरडेनही,
पण त्यानेच मी तळपत जाईन.
जे उरेल ते दिव्य दिसेल.
समाधानाने बहरलेले,
आनंदाचे अस्तित्व असेल.
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १५ ऑक्टोबर २०१५, २०:३०

३ टिप्पण्या:

 1. अप्रतीम. . केवळ अप्रतिम.
  तुमच्या कडे, रामदास पेठ/बजाज नगर ला, युनिक्स शिकत असताना (2002), जर तुमच्या काव्य प्रतिभेची पूसटशी जरी कल्पना असती, तर तुमचा पिच्छा सोडला नसता :)

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद अमित. माझ्या फेसबुक वॉल वरून आणि ब्लाग वरून आपण अजूनही संपर्कात राहू शकतोच की. Stay blessed.. keep smiling

   हटवा
 2. अप्रतीम. . केवळ अप्रतिम.
  तुमच्या कडे, रामदास पेठ/बजाज नगर ला, युनिक्स शिकत असताना (2002), जर तुमच्या काव्य प्रतिभेची पूसटशी जरी कल्पना असती, तर तुमचा पिच्छा सोडला नसता :)

  उत्तर द्याहटवा