(छायाचित्र सौजन्य: प्रथमेश)
.
सुटाबुटात ऐटीत जेव्हा समोर तू आला
तुझा रूबाब बघून डोळापूर कौतुकाला
.
धारदार पैलू तुझे सूट दावतो जगाला
सुटाबुटाचे कोंदण तुझ्यासारख्या हिऱ्याला
.
साध्या पोषाखात छटा मुक्तछंद कवितेची
सुटाबुटात झळाळी वृत्तबद्ध कवितेची
.
काळे डोळे केस काळे सूटबूट सर्व काळे
काळा रंग आजकाल किती आवडतो गडे
.
अश्या रूपात बोलून जिंकशील कुणालाही
अशी स्टाईल अचूक असे वागणे निश्चयी
.
साध्या वेशात येताही जातो डोळ्यात भरून
पुरे जिंकण्याचा बेत सुटाबुटात येऊन
.
तुझे मोकळे वागणे आवडले होते मला
तुझे हासून बोलणे आवडले होते मला
.
आज शिस्तीत पाहीले तुझे करारी बोलणे
धन्य होऊन फिटले माझ्या डोळ्यांचे पारणे
-
तुझे असणे वाढवी गोडी माझ्या आयुष्याची
तुझ्या नजर मिठीत ऊब हिवाळी उन्हाची
.
तुष्की नागपुरी
नागपूर, १२ जून २०२६, २०:३०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा