सोमवार, १७ डिसेंबर, २००७

चहाच्या पेल्यात


brown, originally uploaded by krupali.

.

चहाच्या पेल्यात
हसणे तुझे विरघळले
वा-यावर शुन्यात
बघणे तुझे विरघळले

चहा पितांना देखील
मादक किती दिसावे
अंगांगात माझे
असणे तुझे विरघळले

चहा सारखी साधी
आठवण राहीली नाही
चहाच्या आठवणीत
दिसणे तुझे विरघळले

तुषार जोशी, नागपूर
१७ डिसेंबर २००७

1 टिप्पणी:

  1. चहाच्या पेल्यातले वादळ
    आपुल्या आयुश्यात आलेले
    गोळा करु दे ते साखर कण-क्षण
    पेल्यातच हरवुन विरघळ्लेले

    उत्तर द्याहटवा