सोमवार, ५ मे, २००८

खळखळून मग हसलो

(छायाचित्र - सोनल चिटणीस यांच्या सौजन्याने)

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

मित्रांच्या येण्याला मी स्वर्ग मानले नेहमी
टाळी देऊन घेऊन आयुष्य वाढले नेहमी
मैत्रीच्या नात्याचे सार्थक हो पुन्हा झाले
मैत्रीचा उत्सव झालो पुन्हा एकदा आपण

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

निर्व्याज असे हसताना सातही मजल्यां वरती
आकाशाला भीडते अपुल्या असण्याची मस्ती
रटाळ आयुष्याची राख ही झटकुन अपुली
विस्तव होऊन आलो पुन्हा एकदा आपण

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

कोटीचा अचूक माझ्या अर्थ यांना कळतो
इतके जाणूनच मजला आनंद अमाप मिळतो
काढून जुनी ती घटना डोळ्यांना डोळे भीडले
बहोत खूब म्हणालो पुन्हा एकदा आपण

खळखळून मग हसलो पुन्हा एकदा आपण
देह भान विसरलो पुन्हा एकदा आपण

तुषार जोशी, नागपूर


५ टिप्पण्या:

  1. वाह .. सहीच ..

    यारों .. दोस्ती बडी ही हसीन है ... आणि आपला कंपू बसला एकदा गप्पा ठोकायला की काही विचारायलाच नको .. :)

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा, तुषार!
    असा मित्र/अशी मैत्रीण भेटायला वेळ लागतो, पण एकदा ते भेटले की आयुष्याचं सोनं होऊन जातं!
    कविता प्रचंड आवडली!

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर मैत्रीचं खरं खुरं वर्णन ।

    उत्तर द्याहटवा