सोमवार, ५ मे, २००८

केसांची नागिण

(छायाचित्र, सामिया च्या सौजन्याने)

सांभाळावं किती जीव गेला नादावून
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

काळ्याभोर केसांचे गं अल्लड वळणे
दातात दाबणे ओठ सहज हासणे
कपाळाची बट जशी रूपाला तोरण
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

विसरलो स्वेटर ते घ्यायला मी आलो
तुझ्या अंगावर तेच पाहता खिळलो
केव्हढा तो मोठा माझ्या स्वेटरचा मान
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

मानेवर दिसे हनुवटीची सावली
बघतांना होतो जीव माझा वर खाली
मनी सदा वाजे तुझ्या रूपाची पैजण
डसली गं हाय तुझ्या केसांची नागिण

तुषार जोशी, नागपूर

1 टिप्पणी:

 1. लाल लाल स्वेटर त्यावर रुळला केस संभार...
  ग पोरी थंडी माझी पळाली ,जरा पंखा लाव.

  तुझ्या वक्षस्थळी नागासम केसांचा फ़णा...
  पोरी माझ्या मनाला डसतोय ग, जरा त्यावर उतारा आण.

  तुझ्या मानेवर पडली सावली हनुवटीची.
  पोरी जरा माझ्या डोईवर बी पदर टाक...

  तुला मी काय काय कराया सांगतोय ग?
  ग पोरी जरा माझी जवानी बी संभाळ...
  अतुल मुळे.

  उत्तर द्याहटवा