(छायाचित्र सौजन्य: प्रतिज्ञा)
.
.
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
स्वप्न बघते, सत्य जगते, ती खुळी आहे
कंच हिरवा, रंग खुलतो, शोभतो अंगा
संथ निर्मळ, सौंदर्याची, ही जणू गंगा
त्यात किमया, काय गालावर खळी आहे
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
चंद्र टिकली, मुग्ध करते, साधिशी छोटी
पाहतो जो, मात्र अडतो, डोळिया काठी
लाजली पाहून तिजला हर कळी आहे
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
तुषार जोशी, नागपूर
हैद्राबाद नागपूर प्रवास, २१:४०
स्वप्न बघते, सत्य जगते, ती खुळी आहे
कंच हिरवा, रंग खुलतो, शोभतो अंगा
संथ निर्मळ, सौंदर्याची, ही जणू गंगा
त्यात किमया, काय गालावर खळी आहे
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
चंद्र टिकली, मुग्ध करते, साधिशी छोटी
पाहतो जो, मात्र अडतो, डोळिया काठी
लाजली पाहून तिजला हर कळी आहे
मंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
तुषार जोशी, नागपूर
हैद्राबाद नागपूर प्रवास, २१:४०
.
farach surekh
उत्तर द्याहटवालाजली पाहून तिजला हर कळी आहे
उत्तर द्याहटवामंद हसते, गोड दिसते, सावळी आहे
mastach tushar dada