शनिवार, १४ मे, २०११

कित्ती कौतुक

(छायाचित्र सौजन्य: पूजा)
.
.
कित्ती कौतुक
कित्ती कोतुक तुझ्या डोळ्यात
भरून वाहते गं
हळवं भावुक
कित्ती कौतुक

माझी भरारी
पाहुन तुला मिळालेलं सुख
कणाकणातुन ओसंडताना दिसते ना
धन्य होतो मी
डोळा पाणवे आपसुक
कित्ती कौतुक

किती साधा ना
सर्वांसारखाच एक
तू ईतकं महत्व देऊन मला
सशक्त करतेस
मोठ्ठं करतेस खूप
कित्ती कौतुक

हेच कौतुक
टिकवण्यासाठी
कदाचित काहीही करून जाईन
कळेलच तुला
मग पाहिन गुपचुप
कित्ती कौतुक

तुषार जोशी, नागपूर
१४ मे २०११, १८:३०
.

२ टिप्पण्या:

  1. हेच कौतुक
    टिकवण्यासाठी
    कदाचित काहीही करून जाईन
    कळेलच तुला
    मग पाहिन गुपचुप
    कित्ती कौतुक

    आवडली कविता

    उत्तर द्याहटवा
  2. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
    प्रोत्साहन दिलेत म्हणून हुरुप येतो

    तुषार

    उत्तर द्याहटवा