गुरुवार, १६ जून, २०११

येता जाता

(छायाचित्र सौजन्य: श्वेता पेंडसे)
.
.
येता जाता
कितीतरी फोटो डोळ्यासमोर येतात.
टिकतात काही क्षण,
मग पुसटून जातात.
अश्याच अनेक फोटोंच्या नंतर
अचानक एकदा..
तुझा फोटो आला...
त्याच्या प्रभावाने
माझेच अस्तित्वच पुसटायला लागले.
तू फोटोतूनही
अस्तित्व व्यापून टाकलेस माझे
आता आणिक कोणताच फोटो पाहायची
इच्छा राहिली नाही
कदाचित काळालाही
पुढे सरकायची इच्छा राहिली नव्हती
तुझ्या फोटोकडे पाहण्याचा
माझा उत्सव थांबून तो पण पाहत असावा
तुझ्या बोलक्या डोळ्यांनी
तुझ्या मनमोकळ्या हसण्याने
जे दिले होते ते तर मी स्वप्नातही
कधी मागितले नव्हते
मी इतका खुळा तर कधीच नव्हतो
की एका फोटोवर खिळून जाईन
पण मला कळले
तुमच्या आयुष्यात एक फोटो
असा येतो की मग
सगळे आयुष्य त्याच्या भोवती
खिळून जाते.
तुम्ही स्वप्नातही न मागितलेले
अपार धन तुम्हाला मिळून जाते.
तुझा फोटो पाहिला..
मग मी उरलोच नाही.
तुझ्या अस्तित्वाचा सुंगंध
येऊ लागला पानापानातून
मला जगण्याचं
सुंदर कारण मिळालं तुझ्या फोटोमधून

तुषार जोशी, नागपूर

1 टिप्पणी:

  1. >>> तुझ्या अस्तित्वाचा सुंगंध
    >>> येऊ लागला पानापानातून
    >>> मला जगण्याचं
    >>> सुंदर कारण मिळालं तुझ्या फोटोमधून

    मनात भरकटलेल्या काही गोष्टींना शब्दांची सुद्धा वाट दाखवता येते हे तुमच्या कविता वाचून समजतं जोशी सर. कितीतरी वेळ आपल्या कवितांच्या ओळी वाचत असलो तरी प्रशंसेसाठी 'वाह', 'फारच छान', 'मस्त' या शब्दांपलीकडे लिहिणे न जमणं हि माझी खंत आहे...

    उत्तर द्याहटवा