मंगळवार, १० सप्टेंबर, २०१३

हरखुन जाते

(छायाचित्र सौजन्य: मनू
.
.
निरखुन फोटो, हरखुन जाते
पाहत राहते मी
फोन आल्यावर, साठवलेले
विसरून जाते मी

विचारती ते, आठव येते
दिवस जातो का?
तुम्हाला आठवतो क्षण क्षण
हृदयाचा ठोका

हळव्या त्या तुमच्या भेटीचे
होती भास अजुन
हृदयी स्वप्ने गाली लाली
येते हळुच सजुन

तुमच्या मध्ये दिसतो मजला
स्वप्नांचा राजा
आता सलते मधले अंतर
जीव घेई माझा

तुमच्या साठी अधिर माझा
जन्म किती झाला
लवकर याहो घेऊन जाहो
तुमच्या राधेला

~ तुष्की
नागपूर, १० सप्टेंबर २०१३, २१:५०

२ टिप्पण्या:

  1. मी काय बोलू, काय प्रतिक्रिया देऊ… हेच कळेनासे झालेय….
    तुमचे शब्द लाभले या जीवनाच्या सुरुवातीस…. समजून घ्या भावना…

    उत्तर द्याहटवा