गुरुवार, ३ मे, २००७

खिडकी


DSC08064, originally uploaded by mayuresh tendulkar.

अपुल्या डोळ्यांची खिडकी
फारच छोटी असते
आयुष्याची खोली
अफाट मोठी असते

जे दिसतं ते सत्याच्या
अंशा इतकं असतं
जे असतं ते बहुसंख्य
पदर घेउनी असतं

इतरांचे मग आपण
मोल कसे ठरवावे?
कोण कसे आहे का
निर्णय असले घ्यावे

तुषार जोशी, नागपुर

२ टिप्पण्या:

  1. तुषारदा... कोणी काढलाय हा फोटो..? अप्रतिम आहे यार..... कविता ही सुंदर आहे...
    पण, हा फोटो एक वेगळी भुरळ पाडतोय..

    उत्तर द्याहटवा