(Image courtesy tamadhanaval)
.
ताटात सजवून ठेवलेल्या
रसाळ आंब्याच्या फोडी
मनमुग्ध करणारी त्यांची
जगावेगळी गोडी
त्यानंतर आंब्याचा रस
त्यावर भरपूर तूप
जेवण होईपर्यंत
सगले एकदम चूप
नंतर आंब्याची पोळी
तिची वेगळीच मजा
वाळण्या आधीच पाडायचा
आम्ही तिचा फज्जा
अचूक लक्षात ठेऊन
माझी आंब्याची आवड
याला सगले मिळाले पाहिजे
म्हणून तुझी धडपड
आंबा बघतांना पण आई
तुझे प्रेम जाणवते
त्याची गोडी माझ्या
जगण्याचे बळ वाढवते
तुषार जोशी, नागपूर
sahi...!!!
उत्तर द्याहटवासुरेख...आवडली कविता..
उत्तर द्याहटवासुरेख...आवडली कविता..... पण त्याहुन हि जास्त आवडलि ति त्यातिल मधुरता.... राहुल
उत्तर द्याहटवा