.
.
किती रंग राहून गेलेत
अजुनही घालायचे
किती छंद राहून गेलेत
अजुन जोपासायचे
किती पुस्तके किती कविता
वाचू कसे आणि कधी
भांडार जणू सागर विशाल
थेंबाइतका दिलाय अवधी
सगळे करणे शक्यच नाही
स्वीकारतो शांत होतो
जवळचा पहिला रंग घेतो
पुन्हा प्रवास सुरू करतो
तुषार जोशी, नागपूर
'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Hello Sir,
उत्तर द्याहटवाDonhi kavita apratim aahet.
Kiti Rang aani Shreya donhi sudha. :)
फोटो आणि कविता... वेगवेगळ अस्तित्व आहे पण प्रत्येक कवितेत.. दोन्हीचा छान मेळ जमवलाय की अप्रतिम आहेत..
उत्तर द्याहटवा