बुधवार, १८ जून, २०१४

इतकी सुंदर

(छायाचित्र सौजन्य: यामिनी
.
.
तू इतकी सुंदर आहेस
चंद्र तुला पहायला थांबत असेल
हिला इतके सुंदर का केले
देवाजवळ गाऱ्हाणे सांगत असेल
.
तू इतकी सुंदर आहेस
की पाहणारा कवी होत असेल
तुझ्या प्रत्येक अदेला टिपण्यासाठी
क्षणाक्षणाला कविता लिहित असेल
.
तू इतकी सुंदर आहेस
प्रत्येक तरूण तुझ्या हृदयात
राहायची स्वप्ने पाहत असणार
आणि लग्न झालेले
सगळे सतत हळहळत असणार
.
तू इतकी सुंदर आहेस
सर्व मुलींना वाटत असेल
अन्याय झाला
इतकं नखशिखांत सौंदर्य
हिलाच कशाला?
.
तू इतकी सुंदर आहेस
की मीच हळवा  होतोय
तू सतत आनंदी रहावेस
म्हणून प्रार्थना गातोय
.
तू इतकी सुंदर आहेस
की मला थांबताच येत नाहीये
कितीही लिहिले तरी वाटते
शब्दात मांडताच येत नाहीये
.
तुष्की
नागपूर, १८ जून २०१४, ०८:३०

२ टिप्पण्या:

  1. यामिनीजीं ना बघुन तर आम्हालासुद्धा कवीता सुचतात,फक्त शब्दांची जुळवाजुळव होत नाहि एवढचं😊😊

    उत्तर द्याहटवा
  2. यामिनीजीं ना बघुन तर आम्हालासुद्धा कवीता सुचतात,फक्त शब्दांची जुळवाजुळव होत नाहि एवढचं😊😊

    उत्तर द्याहटवा