रविवार, २२ एप्रिल, २००७

आज आठवू


08-04-8, originally uploaded by Prasad D.

रोज रोज भांडणे आज आठवू
रात्र रात्र जागणे आज आठवू

देत घेत खायचा शाळेचा डबा
शाळेचे चांदणे आज आठवू

दादला तुला कसा मला कसा हवा
स्वप्नांचे पाहणे आज आठवू

फिरून आज घालूया हात साखळी
तळव्यांवर नाचणे आज आठवू

तुषार जोशी, नागपूर

२ टिप्पण्या:

  1. "दादला तुला कसा मला कसा हवा..." - एकदम झकास! भांडणं, जागणं, डबा, दादला... साखळी आणि तळव्यांच नाचणं हे लिहिता लिहिता एका साधारणश्या छायाचित्राला तू केव्हढ्या उंचीवर नेलेयस. ते ही किती सहज रित्या!

    उत्तर द्याहटवा