सोमवार, १६ एप्रिल, २००७

स्वच्छ हासणे

स्वच्छ हासणे
तुझे कमाल गं
काळजामधे
घडे धमाल गं

श्वास चालणे
मधेच थांबतो
हृदयाचे किती
हाल हाल गं

केस मोकळे
हाय ही अदा
हाय घातकी
तुझी चाल ग

स्वच्छ हासणे
तुझे कमाल गं
काळजामधे
घडे धमाल गं

तुषार जोशी, नागपूर

1 टिप्पणी:

 1. >>स्वच्छ हासणे
  तुझे कमाल गं
  काळजामधे
  घडे धमाल गं

  क्या बात है तुषार! सुंदर काव्य केलं आहेस..

  सोनल चिटणीसच्या निखळ सौंदर्याला आपला सलाम!

  --तात्या.

  उत्तर द्याहटवा