मंगळवार, १७ एप्रिल, २००७

या तारांवर



(छायाचित्र सौजन्य: प्रसाद दुधगावकर)

प्रसाद चे तल्लीनतेने तारा छेडण्याचे छायाचित्र आज पाहिले. त्याचा राजबिंडा चेहरा आणि तल्लीनता याने या छायाचित्राला वेगळीच चमक आली आहे. प्रसाद तुझ्या तल्लीनतेसाठी माझे हे शब्द चित्र..

मी वाजवतो मन गाणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर

ऐक जरा रे मित्रा बस बाजूला
आयुष्याचे उखाणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर

घे अशी तान तू मिसळ जीव सुरात
सोडून पुन्हा गाऱ्हाणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर

संगीत भीनले इतके, झोकून देतो
आयुष्याचे चार आणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर

तुषार आता नाद फुलांचे झेला
आनंदाचे तराणे या तारांवर
सुख दुःख येणे जाणे या तारांवर

तुषार जोशी, नागपूर

1 टिप्पणी:

  1. नमस्कार तुषार, सुंदर शब्दात वर्णन केले आहेस तू या मनस्थितीचे. जगामध्ये अनेक लोक असतात की जे आयुष्याला संगीतापासून वेगळं करू शकत नाहित. मी त्यांमधला आहे. आणि एक गोष्ट, ती म्हणजे; असे म्हणतात सौंदर्य व्यक्ती वा वस्तुमध्ये नसते, ते पहाणा-या च्या डोळ्यामध्ये असते. तुझ्या त्या डोळ्यांना माझी मनापासून दाद. क्षणभर विसरले की तू कवीते पुर्वी प्रसादचा उल्लेख केलायस, मला निश्चितच हे म्हणावे लागेल की कविता आशयाने पुरेपूर भरली आहे ते ही साध्या सोप्या शब्दांच्या माध्यमातून!

    उत्तर द्याहटवा